मिरजेतील बँक ऑफ बडोदाची 16 कोटी 97 लाखाची फसवणूक : 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल


 


मिरजेतील बँक ऑफ बडोदाची 16 कोटी 97 लाखाची फसवणूक : 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखलमिरज : मिरजेतील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या कर्जतारण ठेवलेल्या मालाची परस्पर विक्री करून मुंबईतील एका कंपनीने 16 कोटी 97 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 याप्रकरणी बँक मॅनेजर जगदीश नामदेवराव पाटील यांनी निरुपमा पेडूंरकर (नरीमन पॉईंट, मुंबई), अजित नारायण जाधव (सांगली), प्रदुम्न बाळागोंडा पाटील (वसगडे, ता. तासगाव), राहुल दिनेश मित्तल, मिरा दिनेश मित्तल (दोघे रा. माधवनगर बायपास, सांगली), दिपक मधुकर गुरव (रा. कवठेएकंद, ता. तासगाव), गणेश सोपान पवार (रा. तानंग, ता. मिरज) आणि प्रशांत प्रकाश निकम (रा. चिंचणी रोड, तासगाव) या आठ जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे.


 मुंबईतील सीएनएक्स कार्पोरेशन लिमीटेड या कंपनीच्या निरुपमा पेंडूरकर यांनी वरील सात जणांसोबत संगणमत करून मिरजेतील बँक ऑफ बडोदा कडून 16 कोटी 97 लाखाचे कर्ज घेतले होते. त्यासाठी कोल्ड स्टोरेजमधील माल तारण म्हणून ठेवले होते. कर्ज फिटल्याशिवाय मालाची विक्री करू नये असा करार करण्यात आला होता. परंतु तरी देखील दि. 24 मार्च 2017 पासून आजपर्यंत कोल्ड स्टोअरेजमधील मालाची वारंवार विक्री करून बँकेची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured