कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानींचे आंदोलन : 20 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात  

नागपुर : केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी हे आंदोलन करत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला होता. मात्र मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी विकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं.
स्वाभिमानीचा मोर्चा संविधान चौकातून गडकरींच्या घराच्या दिशेने निघाला होता. यावेळी स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. संविधान चौकात दिवाळी साजरी करुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments