खरसुंडी येथील मागासवर्गीय शेतकऱ्याच्या जमिनीत अतिक्रमण ; ॲट्रासिटी अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल 

खरसुंडी येथील मागासवर्गीय शेतकऱ्याच्या जमिनीत अतिक्रमण ; ॲट्रासिटी अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल 


 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : खरसुंडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील मागासवर्गीय शेतकरी नारायण एकनाथ केंगार यांच्या जमीनीतीत अतिक्रमण करून त्यांचा रस्ता जाणीवपूर्वक अडविल्याबद्दल खरसुंडी येथील आरोपी बाळकृष्ण पांडुरंग पाटील व जितेंद्र बाळकृष्ण पाटील यांच्यावर आटपाडी पोलिसात अनु.सूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रासिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


  याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी नारायण एकनाथ केंगार यांची खरसुंडी येथे गट नं. २३८ मध्ये शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये आरोपी बाळकृष्ण पांडुरंग पाटील व जितेंद्र बाळकृष्ण पाटील यांनी अतिक्रमण केलेले आहे. याबाबत नारायण एकनाथ केंगार यांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी शासकीय मोजणी आणली होती. सदरची मोजणी आरोपी बाळकृष्ण पांडुरंग पाटील व जितेंद्र बाळकृष्ण पाटील यांनी अमान्य करून फिर्यादी यांचा शेत जमिनीमध्ये जाणे-येणेचा रस्ता अडविला व फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळी केली व सदर जमिनीमध्ये कशी शेती करता ते बघतो असे म्हणत फिर्यादी नारायण एकनाथ केंगार यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  


  तर दिनांक २३/१०/२०२० रोजी फिर्यादी हे आपली गाय शेतात चरणेसाठी गेले असता याच कारणावरून आरोपी नं. २ जितेंद्र बाळकृष्ण पाटील याने “तुला गाय सांभाळणे होत नसले तर गाय कापून टाक” असे म्हणत पुन्हा जातीवाचक शिवीगाळी करत, “तुम्हांला मस्ती आली आहे. तुम्ही येथे कसे राहता हे बघतो” असे म्हणून जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.


 


 


 जातीवाचक शिवागाळी व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आरोपी बाळकृष्ण पांडुरंग पाटील व जितेंद्र बाळकृष्ण पाटील यांच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाणे येथे भा दं वि कलम ३४७, ३४१, ५०४, ३४ सह अनु.जाती अत्याचार प्रतीबंधक २०१५ चा सुधारीत कायदा कलम ३(१)(एफ)३(१)(जी)३(१)(आर)(एस) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे हे करीत आहेत.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments