धक्कादायक : सांगलीत आईनेच केला आपल्या बाळाचा खून

धक्कादायक : सांगलीत आईनेच केला आपल्या बाळाचा खून


 


धक्कादायक : सांगलीत आईनेच केला आपल्या बाळाचा खून


 सांगली : पलूस तालुक्यातील माळवाडी येथे आईनेच आपल्या अवघ्या तेरा दिवसांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी ऐश्वर्या अमित माळी (वय 23) हिच्या विरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, बाळाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, त्याला होत असलेला त्रास पाहवत नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली ऐश्वर्या हिने दिली आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत उत्तम धोंडिराम माळी यांनी फिर्याद दिली आहे.


 
माळी यांचा भिलवडी-माळवाडी रस्त्यावर साईदीप नावाचा बंगला आहे. सकाळीच माळी कुटुंबीय शेतात कामासाठी गेले होते. त्यांची पत्नी आणि सून शेतातील टाकीजवळ धुणे धूत होत्या. त्यांची मुलगी ऐश्वर्या रविवारी नवजात अर्भकाला घेऊन माहेरी आली होती. बुधवारी सकाळी ती बाळाला बेडरूममध्ये झोपवून घराबाहेर गेली होती. थोड्या वेळानंतर ऐश्वर्या घरात आल्यानंतर बाळ तेथे नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिने सर्व कुटुंबियांना बोलावून घेतले. बाळ घरात नसल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. पण बाळ सापडले नाही. 
त्यानंतर काही जण बंगल्याच्या टेरेसवर गेले. तिथे पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे टाकीत पाहिल्यानंतर बाळाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. नातेवाईकांनी तातडीने याची माहिती भिलवडी पोलिस ठाण्यात दिली. भिलवडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण बंगल्याची पाहणी केली. तासगावच्या उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी पाहणी करून तपासाच्या सुचना दिल्या. भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान ऐश्वर्या हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments