महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 6 नोव्हेंबरपासून होणार सुरु

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 6 नोव्हेंबरपासून होणार सुरु


 


महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 6 नोव्हेंबरपासून होणार सुरुमुंबई – अनलॉक 5 अंतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाने गाईडलाईन्स जारी करुन देशातील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी दिली असताना महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आतापर्यंत बंद होती. पण आता महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 24 तासांच्या आत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे नियमित शोज 6 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.


 


केंद्र सरकारच्या परवानगीनंतर राज्यातील चित्रपटगृह कधी सुरु करणार यांसदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना काही दिवसांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार चित्रपटगृह सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. चित्रपटांसाठी, नाट्यगृहासाठी नवरात्र, दसरा, दिवाळी हा मौसम असतो, त्यामुळे चित्रपगृह सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आम्ही यासंदर्भात सकारात्मक असून याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.


 गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृह बंद असल्यामुळे थिएटर मालकांवर आर्थिक संकट कोसळले होते. अनेक मोठे चित्रपट याकाळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले होते. आता चित्रपगृहे सुरु होणार असल्याने थिएटर मालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.


 माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे चित्रपटगृहे सुरु करण्यासंदर्भात अशी आहे नियमावलीकेवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती चित्रपटगृहात बंधनकारक आहे.
फिजिकल डिस्टन्सिंग चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत पाळणे बंधनकारक आहे.
राखीव आसनव्यवस्था ठेवता येणार नाही.
हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर प्रेक्षकांना पुरवण्यात यावे.
प्रेक्षकांना आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला देण्यात यावा.
चित्रपटागृहात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे.
चित्रपटगृहांमध्ये फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments