Type Here to Get Search Results !

"रश्मी ठाकरे  यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली" :  किरीट सोमय्या यांचा दावा


 


"रश्मी ठाकरे  यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली" :  किरीट सोमय्या यांचा दावा



मुंबई : अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांचंही नाव भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतलं आहे.




किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट केली आहेत. “ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत.




रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies