Type Here to Get Search Results !

कोल्हापूरमध्ये टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न : तीन आरोपी अटकेत 


 


कोल्हापूरमध्ये टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न : तीन आरोपी अटकेत 




कोल्हापूर : गांजा पोहचवण्याचे काम करणाऱ्या तिघांना कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहोचवण्याचा इरादा होता. मात्र तिघांना कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.




टेनिस बॉल कापून पुन्हा चिकटवलेले हे बॉल आणि १५ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही संशयित पुण्याचे आहेत. 
 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies