“हिंमत असेल तर रोखून दाखवा”, राम कदम याचं आव्हान

“हिंमत असेल तर रोखून दाखवा”, राम कदम याचं आव्हान


 


“हिंमत असेल तर रोखून दाखवा”, राम कदम याचं आव्हानमुंबई - गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान राम कदम यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहे. 


तळोजाला निघण्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणीबाणी लादली आहे. आता मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान राम कदम यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments