चेन्नईतील स्वयंसेवकाच्या मेंदू कार्यात कोव्हिशिल्ड लस घेतल्याने बिघाड झाल्याची तक्रार ; मागितली ५ कोटी रुपये भरपाई

चेन्नईतील स्वयंसेवकाच्या मेंदू कार्यात कोव्हिशिल्ड लस घेतल्याने बिघाड झाल्याची तक्रार ; मागितली ५ कोटी रुपये भरपाई
 चेन्नईतील स्वयंसेवकाच्या मेंदू कार्यात कोव्हिशिल्ड लस घेतल्याने बिघाड झाल्याची तक्रार ; मागितली ५ कोटी रुपये भरपाई

नवी दिल्ली : चेन्नईतील चाळीस वर्षीय स्वयंसेवकाच्या मेंदू कार्यात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस घेतल्याने बिघाड झाल्याचे त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. सदर व्यक्तीची आकलन-बोधन क्षमता कार्येही या लशीमुळे बिघडल्याची तक्रार आहे. कोविड प्रतिबंधक लस टोचल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून आल्याच्या प्रकरणी भारतीय औषध महानियंत्रक व संस्थात्मक नैतिकता समिती चौकशी करीत असून सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेतलेल्या उद्योग सल्लागार स्वयंसेवकात मेंदू आजाराची गंभीर लक्षणे दिसून आल्याचे या स्वयंसेवकाने संबंधित संस्थांना जारी केलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

दरम्यान ५ कोटी रुपये भरपाई या स्वयंसेवकाने मागितली आहे. त्याचबरोबर लस चाचण्या, उत्पादन व वितरण यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, जर असे काही दुष्परिणाम संबंधित व्यक्तीमध्ये झाले असतील व त्याचा लस देण्याशी काही संबंध असेल तर त्याची वैज्ञानिक पद्धतीने चौकशी केली जाईल. जर यात घाईने चौकशी केली तर चुकीचे निष्कर्ष हाती येतील. याबाबत संस्थात्मक नैतिक समिती व महाऔषध नियंत्रक चौकशी करतील.या स्वयंसेवकाच्या म्हणण्यानुसार त्याला आता एन्सेफलोपॅथीचा त्रास होत असून त्याच्या मेंदूवर दुष्परिणाम झाले आहेत. हे परिणाम लस घेतल्यानंतरच झाले असून ही लस सुरक्षित नाही. त्याचा इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम म्हणजे इइजी काढण्यात आला असता त्याच्या मेंदूतील दोन्ही अर्धगोलार्धात काही प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून आले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments