कलेढोणहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात : 16 जखमी तर एकाचा मृत्यू

कलेढोणहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात : 16 जखमी तर एकाचा मृत्यू

 कलेढोणहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात : 16 जखमी तर एकाचा मृत्यू


मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलेढोणहून सायंकाळच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या एसटी बस (क्रमांक एमएच १४ – बीटी ४६९७) याला अनोळखी कंटेनरने उजव्या बाजूने मागून धड़क दिली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

 

 या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये कलेढोण येथील दोन व्यक्तींचा समावेश असून साजन शिकलगार व बशीर शिकलगार अशी त्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस साताऱ्याहून (कलेढोणहून ) मुंबईकडे  येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा बसचा पत्रा पूर्णपणे निखळला आहे. कंटेनरने एसटी बसचा उजव्या बाजूकडील पत्रा कापत जबर धडक दिल्याने उजव्याबाजूकडील आसनावर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले. आयआरबी कंपनीचे मदतकार्य वेळीच पोहोचल्याने सुरक्षितरित्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी  तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments