Type Here to Get Search Results !

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता




 अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर  आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता 




मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असून विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले आहे. ऊर्मिला यांनी कॉंग्रेसमधून २०१९ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक होत होते; मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच पाठिंबा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. निवडणुकीनंतर त्या कॉंग्रेसपासून लांब होत्या. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना आणि बॉलीवूडसोबत पंगा घेतला होता. त्यामुळे तिला थेट प्रत्युत्तर देणाऱ्या ऊर्मिला मातोंडकर एकमेव बॉलीवूड अभिनेत्री होत्या. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते.






मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून ऊर्मिला यांचे नाव सुचवले. तसेच यापूर्वी ऊर्मिला आणि ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. तेव्हापासून त्या शिवसेनेत प्रवेश कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस आज ऊर्मिला शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies