आटपाडी व सांगोला शिक्षक समितीचे काम गतीशील : राज्याच्या "या" नेत्याकडून शिक्षक समितीच्या कामाचे कौतुक

आटपाडी व सांगोला शिक्षक समितीचे काम गतीशील : राज्याच्या "या" नेत्याकडून शिक्षक समितीच्या कामाचे कौतुकआटपाडी व सांगोला शिक्षक समितीचे काम गतीशील : राज्याच्या "या" नेत्याकडून शिक्षक समितीच्या कामाचे कौतुक  

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : राज्यातील दौऱ्याच्या निमीत्ताने सांगली जिल्हा दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष ,शिक्षक नेते काळूजी बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष केदुजी देशमाने, नाशिक जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, चांदवड चेअरमन साहेबराव पवार यांच्या शिष्टमंडळाचीआटपाडी समिती सैनिक व सांगोला समिती सैनिकांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी बोरसे पाटील यांनी राज्यातील शिक्षक समितीचा आढावा मांडत भविष्यकालीन वाटचाल, तसेच मजबूत संघटन बांधणीसाठीचे मार्गदर्शन केले. 
शिक्षकांची व समाजाची प्रामाणिक सेवा अविरतपणे करा तुमचा सर्वोच्च सन्मान होईल. सांगोला व आटपाडी शिक्षक समितीचे काम गतीशील असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांचा आटपाडी व  सांगोलकर समिती सैनिकांनी सन्मान केला व पुढच्या दौऱ्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यू. टी. जाधव, तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, सांगोला सोसायटीचे माजी संचालक राजेंद्र माने, शिक्षक नेते पतंगराव बाबर, आटपाडी सरचिटणीस प्रवीण बाड, माजी अध्यक्ष दीपक कुंभार, आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, शिक्षक नेते संजय कबीर, समिती सैनिक भास्करराव डिगोळे , नानासाहेब झुरे, काकासाहेब पाटील, श्री.हात्तेकर, मापटेमळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महादेव बनसोडे आदी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments