मंदिरात चप्पल घालून गेल्याने दोन गटात धुमचक्री ; १२ जणावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल झालेल्यामध्ये माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर व आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांचा समावेशमंदिरात चप्पल घालून गेल्याने दोन गटात धुमचक्री ; १२ जणावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल झालेल्यामध्ये माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर व आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांचा समावेश

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी : मंदिरात चप्पल घालून गेल्याने आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथे दोन गटात झालेल्या धुमचक्रीमध्ये १२ जणावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल झालेल्यामध्ये माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान जि.प. सदस्य ब्रम्हानंद पडळकर तसेच  आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांचा समावेश असल्याने आटपाडी शहरात काही काळ तणावाची वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दीपावलीनिमित्त मासाळवाडीच्या यात्रेला माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर हे कार्यकर्त्यासह गेले होते. यावेळी भुते हे मंदिरात पायात चप्पल घालून गेल्याने गावातील तरुणाने त्यांना मारहाण केली. यावेळी ग्रामस्थांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी मासाळवाडी येथे विनायक मासाळ यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली यामध्ये घराबाहेर असलेल्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये त्यांचे दोन भाऊ आणि आई जखमी झाले. याबाबत मासाळ यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान जि.प. सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पडळकर समर्थकांनी पोलीस ठाणेसमोर मोठी गर्दी केली होती. 
तर पडळकर गटाचे कार्यकर्ते विष्णू अर्जुन यांच्या गाडीची विरोधकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली तसेच गाडीतील सोनेही ही चोरून नेले असल्याची फिर्याद  विष्णू अर्जुन यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारी मध्ये आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे, प्रा.एन.पी. खरजे, राजू अर्जुन यांचा समावेश आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured