Type Here to Get Search Results !

भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन




 भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन






नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचा संघर्ष अजूनही चालूच आहे. कित्येक नागरिकांनी कोरोनामुळे प्राण गमावलेले आहेत. दरम्यान भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 





गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री गहलोत यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. 'आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झालं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.' असं ट्विट त्यांनी केलं आहे. 





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies