भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

 
मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.  प्रसाद लाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.


डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार सुरू असल्याची माहिती देखील प्रसाद लाड यांनी स्वत: दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे,स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.'

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured