“वर्षभर बदल्या करा, आणि माल कमवा, हे धोरण” : या भाजप नेत्याची सरकारवर टीका
“वर्षभर बदल्या करा, आणि माल कमवा, हे धोरण” :  या भाजप नेत्याची सरकारवर टीका 


पुणे :  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी चिंचवड येथे मेळावा झाला. राज्य सरकार रोज घोषणा करते आणि मागे घेते. पलटूराज सरकार आहे. वर्षभर बदल्या करा, आणि माल कमवा, हे धोरण अवलंबले आहे. सगळीकडे बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे केली.

'' फडणवीस म्हणाले, ''2002 चा अपवाद वगळता पुणे हा पदवीधर मतदार संघ भाजपचा गड होता. तो राखायचा आहे. कोविडचे आव्हान देशासमोर उभे राहिले असताना, राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी याना नावे ठेवायचे. मात्र, पंतप्रधान सामान्य माणसांची चिंता करीत होते. आत्मनिर्भर भारत सुकर जीवन केले. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तूमच्या, आम्ही आमच्या घरी सुखरूप रहा एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाठ बिल दिले. दोन खोल्यासाठी २० हजार बिल आले होते. वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे. जी बिले वाढीव आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हे राज्य सरकार रोज नवी घोषणा करीत आहे आणि मागे घेत आहे. पलटू राज सरकार आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज  


Post a Comment

Previous Post Next Post