बिगब्रेकिंग : पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे या नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

बिगब्रेकिंग : पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे या नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

 बिगब्रेकिंग : पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे या नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महा विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments