ठाण्यात मनसेला मोठा धक्का : मनसेच्या या बड्या नेत्याचा राजीनामा

ठाण्यात मनसेला मोठा धक्का : मनसेच्या या बड्या नेत्याचा राजीनामा

   
ठाणे  :  गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ठाण्यातील आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.


ओवळा माजिवडा उपविभाग अध्यक्ष प्रलय साटेलकर असे या पदाधिकाऱ्यांचे नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत ठाण्यातूनच पोहोचून दिले जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याआधी डॉ. ओंकार माळी आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे. 


ठाणे मनसे म्हणजे अविनाश जाधव असे समीकरण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. त्यांना कोणती जबाबदारी दिली जात नाही. राज ठाकरेंवर नाराज नाही. गेले अनेक दिवस पक्षात घुसमट होत होती शेवटी कंटाळून शनिवारी राजीनामा दिल्याचे साटेलकर यांनी सांगितले.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments