पण आमच्या हृदयावर कोरलेले रामाचे नाव कोणी मिटवू शकत नाही : कंगना

पण आमच्या हृदयावर कोरलेले रामाचे नाव कोणी मिटवू शकत नाही : कंगना

 मुंबई : बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. या घटनेची माहिती जाहीर झाल्यानंतर बांगलादेशमधील कट्टर अथवा कडव्या विचारांच्या मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली होती. शाकिबला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून शाकिबने माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने  यावर   प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने एक न्यूज रीट्वीट करत या संपूर्ण प्रकरणावर कमेंट केली.  ‘मंदिरांना इतके का घाबरता? काही तर कारण असेन, उगाच कोणी इतके घाबरत नाही. आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू पण आमच्या हृदयावर कोरलेले रामाचे नाव कोणी मिटवू शकत नाही. स्वत:च्या पूजेवर विश्वास नाही की, तुमचा भूतकाळ तुम्हाला मंदिरांकडे आकर्षित करत आहे. विचारा स्वत:ला... ’असे कंगना म्हणाली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments