केंद्राची महाराष्ट्र बद्दलची भूमिका दुटप्पी : विजय वडेट्टीवार

केंद्राची महाराष्ट्र बद्दलची भूमिका दुटप्पी : विजय वडेट्टीवार

 नागपूर : वीजबिला संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ संदर्भात ही एक हजार कोटी रुपयांची मदत राज्याने मागितलेली असताना, केंद्राने अवघ्या २६८ कोटींची मदत केली आहे. त्याबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते शब्द ही बोलत नाही. महाराष्ट्रात अनेक संकट आलेले असताना केंद्राची महाराष्ट्र बद्दलची भूमिका दुटप्पी आहे, दुजाभावची आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे वर्ष आर्थिक, नैसर्गिक सर्व प्रकारचे संकट घेऊन आले आहे. अजून केंद्राने ३८ हजार कोटींचा जीएसटीचा परतावा दिलेला नाही. विदर्भात ज्या चार जिल्ह्यात महापूर आला होता, तिथे आतापर्यंत २०० कोटींचा वाटप शेतकऱ्यांना केला आहे. या चार जिल्ह्यांसाठी ७०० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.मात्र, अजून ही केंद्र सरकारने एका दमडीची मदत केलेली नाही, असे ते म्हणालेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments