“मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी” : संजय निरुपम

“मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी” : संजय निरुपम
मुंबई : शहरातील कराची स्वीट्स या नावामुळे देशातील सैनिकांचा अपमान होतो असं नितीन नांदगावकर यांचे म्हणणं होतं, त्यासाठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती. 


 यात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट केलं की, भारतात चायनीज हॉटेलचा चीनशी काही देणंघेणं नाही, तसेच वांद्रे येथील कराची स्वीट्सचं पाकिस्तानशी कोणतंही नातं नाही. हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचं नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी असं म्हटलं.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments