कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी : मोहनभाऊ देशमुख

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी : मोहनभाऊ देशमुखकोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी : मोहनभाऊ देशमुख 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी : देशासह संपूर्ण जगातील नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगामुळे आपला जीव गमावला लागला आहे. अजूनही या रोगावर कोणतीही लस प्रभावी ठरली नसल्याने तसेच राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन खानापूर मतदारसंघाचे शिवसेना विधानसभा संघटक मोहनभाऊ देशमुख यांनी केले आहे.

तसेच लॉकडाऊनमुळे सर्वांचाच नित्यक्रम बदलला आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंची खरेदी ते अगदी वर्क फ्रॉम होमपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. स्वत:च्या शरीराची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा, सकस आहार घ्या, पुरेसं पाणी प्या. मद्यपान आणि धूम्रपान टाळा, कोरोना व्हायरसच्या साथीविषयी विश्वासार्ह माहितीवरच विश्वास ठेवा. आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी वेळ द्या. छंद जोपासा. झोपेच्या आधी कॅफिनयुक्त पेय किंवा स्क्रिनचा अतिरेकी वापर टाळा असे ही आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments