“काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल” : या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

“काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल” : या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा
नवी दिल्ली : नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीत महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी ही निराशाजनक होती. काँग्रेसनं ७० जागांवर निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना केवळ १९ जागांवरच विजय मिळाला. दरम्यान, एकंदरीत परिस्थितीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असं वाटतंय की आता काँग्रेसचं कोणी माय-बाप शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचं भविष्य नाही असं वाटत आहे,” असं केजरीवाल म्हणाले.


 “काँग्रेसचे पूर्णपणे अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा कोणी माय-बाप आता शिल्लक नाही. राज्याराज्यात लोकं भाजपाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेसचं भाजपाचं सरकार स्थापन करून देतं,” असं म्हणत केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. “काँग्रेसचे सर्व आमदार भाजपात सामील होतात. तुम्ही मतं काँग्रेसला द्या किंवा भाजपाला, सरकार तर भाजपाचंच बनतं,” असंही ते म्हणाले.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments