Type Here to Get Search Results !

देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक




देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक 






नवी दिल्ली : देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेणार आहेत. ही बैठक सकाळी १०.३० ला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पंतप्रधान ज्या राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यात प्रामुख्याने राज्यांची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी काय आराखडा आखला आहे याची माहिती घेणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान लॉकडाऊनच्या शक्यतेवरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 





कोरोनाच्या लसीचे वितरण कशा प्रकारे करता येईल आणि कोणा कोणाला प्राथमिकता द्यायची आहे हे ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्येश आहे. असे असले तरी देशात दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या शक्यतेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतात सोमवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९१ लाखांच्या वर पोहोचली होती. यात दिवसभरातील ४४ हजार ५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. 





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies