आसद च्या युवकाने घालुन दिला आदर्श ऊस शेतीचा पायंडा

आसद च्या युवकाने घालुन दिला आदर्श ऊस शेतीचा पायंडा


 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव : आसद ता. कडेगाव येथील संदेश जाधव या युवकाने गेली सहा वर्षे उच्चांकी ऊसाचे उत्पादन काढुन तरुण शेतकऱ्यांच्या समोर आदर्श ठेवला आहे.


 


  अलिकडच्या काळातील तरणाई कृषी क्षेत्राकडे तुच्छ भावनेने बघत असताना या युवकाने मात्र ऊस शेतीमध्ये एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन सलग सहा वर्षे घेत असल्याने शेतीची यशस्वीता तरुणासमोर मांडली आहे. जाधव यांना या कार्यात क्रांती सह साखर कारखान्याच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शन व साहाय्य केले जात आहे.


 


  संदेश जाधव यांच्या या यशातुन नवयुवक शेतकरी व तरूणाईने प्रेरणा घेवुन असे यशस्वी प्रयोग आपल्या शेतात राबविले पाहीजेत.  त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या या यशात  क्रांती सह साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व साथ लाभली आहे. त्यामुळेच मी सातत्याने सहा वर्षे ऊस उत्पादनात सातत्य राखु शकल्याचे जाधव यांनी सांगितले.


 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments