या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन : चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त

या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन : चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त

 या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन : चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा अभिनेता वरुण बडोलाने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. विश्व मोहन बडोला यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘अनेकजण तक्रार करतात की त्यांची मुले त्यांचे ऐकत नाही. पण अनेकजण हे विसरतात की त्यांची मुले नेहमी त्यांना पाहूनच शिकत असतात. माझ्या वडिलांनी कधीच मला समोर बसवून काही शिकवले नाही. शिकत राहणे हाच जगण्याचा योग्य मार्ग आहे असल्याचे त्यांनी मला शिकवले’ या आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments