Type Here to Get Search Results !

सुशांतची थट्टा वाटणाऱ्या रणवीर सिंगच्या जाहिरातीवर बंदीची मागणी

 



मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर चाहत्यांनी त्याला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंडही करु लागल्या. त्यातच एका नव्या ट्रेंडनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा ट्रेंड आहे  बिंगो.





मुख्य म्हणजे या ट्रेंडच्या माध्यमातून नेटकरी अभिनेता रणवीर सिंग याच्यावर निशाणा साधत आहेत. रणवीरचा सहभाग असणारी एक जाहिरात खटकल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या जाहिरातीत रणवीर बिंगो खाताना दिसत आहे. रणवीर साकारणाऱ्या पात्राच्या घरी काही पाहुणे येतात. ही पाहुणे मंडळी त्याला भविष्यासाठीचे बेत विचारतात. तेव्हा तो असं काही उत्तर देतो की पाहुण्यांना पुढं काही सुचतच नाही. मार्स, फैंटम, एलियन अशा शब्दांचा वापर करत तो उत्तरं देतो.

 





सोशल मीडियावर या जाहिरातीचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. कारण, चाहत्यांच्या मते यातून सुशांतची थट्टा करण्यात आली आहे. सुशांतला अंतराळ आणि सायन्स मध्ये रस होता. या जाहिरातीकडे त्याच संदर्भातून पाहिलं जात आहे. ज्यामुळं आता थेट या जाहिरातीवरच बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. 





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies