रेल्वे, लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय आठ दिवसानंतर होण्याची शक्यता : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई  : दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यआता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनेही काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. दिल्लीनंतर मुंबईतही कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये बाधितांच्या आकडेवारीत वाढ असल्यास आठ दिवसांनंतर अत्यावश्यतक सेवा वगळता रेल्वे, लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे; मात्र कोरोना संक्रमण टक्केवारी आटोक्यात असल्यास काटेकोर नियम-अटी आणि शर्थी लावून लोकल परवानगी दिली जाणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

कोविडची लाट ओसरल्यानंतर सरसकट महिलांनाही नियोजित वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता सरसकट लोकल प्रवासाला मुभा देण्याचा रीतसर प्रस्ताव सरकारने रेल्वेकडे पाठवला; मात्र आता दिल्लीची परिस्थिती बघता मुंबईतही लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते. तसे संकेतही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. रेल्वे आणि सार्वजनिक प्रवासी सेवेवरही लॉकडाऊनचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments