Type Here to Get Search Results !

पुणे विभागीय पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  सांगलीच्या अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर


 


पुणे विभागीय पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  सांगलीच्या अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर




सांगली :  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीच्या अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जयंत पाटीलय यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,  विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.


 



 


पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपने या ठिकाणी सांगलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी बरीच रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. या जागेसाठी लाड यांच्यासह सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे इच्छूक होते. कोकाटे यांनी प्रचाराला सुरुवात केली तर पाटील यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्याकडे ठाण मांडले होते. दुसरीकडे लाड समर्थकांनी उमेदवारी अरुण लाड यांनाच मिळेल असे दावे आठ दिवसांपूर्वीच केले होते. अरुण लाड यांनी मागील निवडणुकीत बंडखोरी केली होती. यामुळे राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांचा पराभव झाला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते.



 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies