प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा हा राजकीय षढयंत्राचा भाग : सचिन सावंत

प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा हा राजकीय षढयंत्राचा भाग : सचिन सावंत
 प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा हा राजकीय षढयंत्राचा  भाग : सचिन सावंत
मुंबई : “शिवसेनेचे नेते पैसे बोगस कंपन्यांमध्ये गुंतवतात हे मला माहीतेय. त्यांनी भ्रष्टाचाराचा बेनामी पैसा लाटला असेल तर कारवाई व्हायला हवी” अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली. ईडी विनाकारण जाणार नाही. ठाण्यात शिवसेना नेत्यांचे भ्रष्टाचार वर्षानुवर्षे सुरुच आहेत. काहीतरी घडलंय हे नक्की म्हणून ईडी सरनाईकांच्या घरी गेल्याचे भाजप नेते निलेश राणेंनी म्हटलंय. सरनाईकांबद्दल काही असेल ते ईडी स्पष्ट करेल. खोट बोला पण रेटून बोला हे कॉंग्रेसचं काम असल्याचे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले. 

दरम्यान, प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा हा राजकीय षढयंत्राचा एक भाग आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील हे झालंय. दबावाच राजकारण करण्यासाठी भाजप हे करतं. भाजपच्या नेत्यांवर अशी कारवाई कधी होताना दिसत नाही. भाजपचा विरोध केला तर अशा कारवाई होणार हे अपेक्षित असल्याची टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. 


तर ईडीने हा छापा नेमका कोणत्या कारणासाठी टाकला ? हे थोड्यावेळाने स्पष्ट होईल. इन्फोर्समेंट डिरेक्टरची ही टीम सरनाईकांनी केलेल्या व्यवहारामध्ये आर्थिक घोटाळा आहे का ? याची चौकशी करत आहेत. सरनाईक हे सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments