पण मी जिवाला भित नाही. जे व्हायचे ते होवो : विजय वडेट्टीवार

पण मी जिवाला भित नाही. जे व्हायचे ते होवो : विजय वडेट्टीवार


 


पण मी जिवाला भित नाही. जे व्हायचे ते होवो : विजय वडेट्टीवारनागपूर :  ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडून सरकार चालवण्यचा यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला. त्यावर या संदर्भात मला धमक्या मिळत आहेत, पाहून घेण्याची भाषा बोलली जात आहे. पण मी जिवाला भित नाही. जे व्हायचे ते होवो, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. 


 मराठा व ओबीसी समाजांमध्ये दुफळी निर्माण करीत असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोपाचा वडेट्टीवार यांनी साफ इन्कार केला. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही अठरापगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो. यासंदर्भात धमक्या मिळत असल्या तरी मी जीवाला भीत नाही, जे व्हायचे ते होवो, अशी टोकाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. माझ्या समाजाला आरक्षण मिळल्याखेरीज भरती होऊ देणार नाही, हा काहींचा द्वेष्टेपणा आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. मी वारसा हक्काने राजकारणात आलो नसल्याचा टोला त्यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments