१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू

१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू


 


१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू


 मुंबई : कोरोना रुग्णांचा घसरती संख्या पाहता आता राज्य सरकारने शिथिलता दिली असून विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचबरोबर या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. टप्प्याटप्प्याने कंटेनमेंट झोन नाहीत अशा विभागांतील महाविद्यालये सुरू करण्यात यावेत अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. विशेष विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये महाविद्यालयातील प्रवेशासाठी आरोग्य सेतू ॲप असणे बंधनकारक असेल.
संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करावेत, असेही आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांतील एकूण विद्यार्थी संख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश द्यावा, असेही यात म्हटले आहे.
महाविद्यालये प्रत्यक्ष जरी सुरू झाले तरी ऑनलाइन शिक्षण विद्यापीठांनी सुरू ठेवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे शक्य आहे, तेथे निवासी महाविद्यालयांत हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली. पण एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी द्यावी, असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. जर महाविद्यालय सुरू केल्यावर कोणत्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे जाणवली तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येईल अशी सुविधाही असावी आदी सूचनाही केल्या आहेत. राज्यातील शिक्षण संस्थांसाठी राज्य सरकारांनी एकसमान नियम करावेत, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments