"मराठा समाजातील कर्तुत्ववान महिला मुख्यमंत्री व्हावी, आपला‌ त्यास संपूर्ण पाठिंबा असेल," या विधानावरून माजी मंत्री आशिष शेलार यांचा यू‌ टर्न

"मराठा समाजातील कर्तुत्ववान महिला मुख्यमंत्री व्हावी, आपला‌ त्यास संपूर्ण पाठिंबा असेल," या विधानावरून माजी मंत्री आशिष शेलार यांचा यू‌ टर्न
पुणे : "देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री म्हणून उमेदवार राहतील," 'ते' विधान फक्त कार्यक्रमापूरते मर्यादित होते, असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले आहे. "मराठा समाजातील कर्तुत्ववान महिला मुख्यमंत्री व्हावी, आपला‌ त्यास संपूर्ण पाठिंबा असेल," या विधानावरून माजी मंत्री आशिष शेलार यांनी यू‌ टर्न घेतला आहे.  


पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. "पत्रकार विजय चोरमारे लिखित मराठा समाजातील कर्तृत्ववान महिला" या पुस्तकाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी मराठा समाजातील कर्तृत्ववान महिलेने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, असे विधान केले होते. पवार यांच्या उपस्थितीत केलेल्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. दरम्यान, या केलेल्या विधानावरून 'यू टर्न' घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments