आजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट

आजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट
 आजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट 

मुंबई : देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून या चाचणीला सुरुवात झाली आहे. 

यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी यापूर्वीच विमान, रेल्वे आणि रस्ता मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर केलं आहे. त्याचबरोबर सोमवारी नव्या प्रवास नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. हा अहवाल त्यांना विमानतळांवर तसेच रेल्वे स्थानकांवर दाखवावा लागणार आहे. महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी विमान प्रवाशांना तीन दिवस आधी ही चाचणी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार नाही.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments