कौठूळी येथील वाळू तस्करावर कारवाई करा ; ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन ; अन्यथा आंदोलनाचा इशारा 

कौठूळी येथील वाळू तस्करावर कारवाई करा ; ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन ; अन्यथा आंदोलनाचा इशारा 


 


 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : कौठुळी ता. आटपाडी, जि.सांगली येथील वाळूतस्करावर तातडीने कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. वाळूतस्करांनी चोरी केलेल्या 100 ते 150 ब्रास वाळू चोरीचा पंचनामा करावा, वाळू तस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आटपाडीचे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना कौठूळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. 


 


  यावेळी सरपंच गणपत मंडले, ग्रामपंचायत सदस्य गोविंद कदम, मोहन कदम, जालिंदर कदम, प्रदीप कदम, सिद्धनाथ जरे, बाळू कदम, अतुल पाटील, प्रमोद दत्तोपंत कदम  यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौठूळी येथील वाळू तस्कर दिनेश दत्तू कदम व संदीप दत्तू कदम यांनी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी कौठुळी येथील वाळू चोरी प्रकरणातून राज नारायण कदम यास मारहाण केली होती. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अंदाजे 150 ब्रासची वाळू चोरी असताना केवळ 4 ब्रास वाळू चोरीचा पंचनामा करण्यात आला होता. वस्तुस्थितीची माहिती न घेता व घटनास्थळी भेट न देता पंचनामा करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


 


 


  


 कौठुळी येथील माण नदीपात्रात 2 नोव्हेंबर ला 2 ट्रॅक्टर व 1 जेसीबी द्वारे बेकायदेशीररित्या वाळू उपसा करीत होते त्यामुळे शेतकरी राज नारायण कदम यांना वाहनाचा आवाजाचा त्रास व त्यांच्या शेतीतून वाहने नेत असल्यामुळे नुकसान होत असल्यामुळे राज कदम याने वाहने अडवून धरली. त्यानंतर वाळू तस्कर दिनेश कदम व त्याचा भाऊ संदीप यांनी येऊन दमदाटी करून जीव मारण्याची धमकी देत राज यास ढकलून देत लोखंडी रॉड मारहाण केली होती. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments