“नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” : अमृता फडणवीस

“नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” : अमृता फडणवीस

 
मुंबई : आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाचं निमित्त साधत.माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असं आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस राजकारणापासून अलिप्त असल्या तरी राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर त्या भूमिका मांडतात. अनेक वेळा त्या चर्चेतही आल्या. आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments