आटपाडीत डाळिंबाला उच्चांकी दर ; आवक कमी झाल्याचा परिणामआटपाडीत डाळिंबाला उच्चांकी दर ; आवक कमी झाल्याचा परिणाम 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : माणदेशातील शेतकऱ्यांच्या हातामध्ये चार पैसे मिळवून देणाऱ्या डाळींबाला आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख डाळिंब मार्केट मध्ये उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी वर्गामधुन व्यक्त होत आहे.

आटपाडी तसेच माणदेशामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक डाळिंब बागा उध्दवस्त झाल्याने डाळिंबाची आवक प्रचंड घटली होती. परंतु या अतिवृष्टीत ही ज्याच्या बागा शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांच्या डाळींबाला प्रति किलो तब्बल ६२५ रूपये असा दर मिळाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी कोरोना त्या पाठोपाठ अतिवृष्टीने डाळिंबाच्या बागांनाही मोठा फटका बसल्याने बाजारात डाळिंब उपलब्ध होत नाहीत. 
बुधवारी बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांच्या आटपाडीतील मंगलमुर्ती फ्रूट सप्लायर्सच्या अडत केंद्रावर चोपडी येथील पाडुरंग गायकवाड यांच्या डाळिंबाला तब्बल ६२५ रूपये इतक्या दराची बोली लागली. तर त्यांच्याच अन्य डाळिंबाला ६०० रूपयांचा दर मिळाला. सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील नामदेव बंडगर यांच्या डाळिंबाला ४२५ रूपये इतका दर मिळाला. नाझरा येथील सिध्दनाथ सरगर यांच्या डाळिंबाला ४०० रूपये, बलवडी येथील मन्सुर शेख यांच्या डाळिंबाला ५२५ रूपये, फडतरी येथील सुरेश तबारे यांच्या डाळिंबाला १५१ रूपये दर मिळाला. डाळिंबाला विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांत ही समाधान होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured