मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री : आमदार प्रसाद लाड

 
मुंबई : मी ६ वेळा जनतेतून निवडून आलोय, प्रसाद लाड यांनी एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावं असा टोला एकनाथ खडसेंनी प्रसाद लाड यांना लगावला होता. त्यावर आता आमदार प्रसाद लाड यांनीही एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आजवरच्या राजकारणात भाजपा संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढं दिलं, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत अशी टीका त्यांनी एकनाथ खडसेंवर केली. मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे असा टोलाही आमदार प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured