IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची अंतिम फेरीत धडक ; सनरायझर्स हैदराबादचा पराभव 


 


 


अबुधाबू : IPL 2020 च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने धडक मारली असून सनरायझर्स हैदराबादचा त्यांनी १८ धावांनी पराभव केला. 


 


 केन विल्यम्सनची ६७ व समद ची ३३ धावांची खेळी हैदराबादचा पराभव टाळू शकली नाही. दिल्लीकडून रबाडाने शानदार गोलंदाजी करीत ४ विकेट घेतल्या. 


 


  


 दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला मार्कस स्टॉयनिसला पाठवून दिल्लीने मोठा डाव खेळला. ही त्यांची खेळी यशस्वी ठरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावा चोपल्या. राशिद खानने हैद्राबादला पहिलं यश मिळवून दिलं. स्टॉयनिस ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, धवन दुसऱ्या बाजूनं दमदार खेळ सुरूच ठेवला. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 


 


  


 अय्यर-धवन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. जेसन होल्डरनं ही जोडी तोडली. अय्यर २१ धावांवर माघारी परतला. हैदराबादच्या खेळांडूकडून क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या. त्याचाच फायदा आज दिल्लीच्या फलंदाजांनी पुरेपूर उचलला. सामन्यात शिमरोन हेटमायरनंही चांगले हात धुऊन घेतले. 


 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured