Type Here to Get Search Results !

गुगल फोटो युजर्ससाठी मोठी बातमी : १५ जीबीपेक्षा अधिक स्टोरेज स्पेस हवी असल्यास पैसे मोजावे लागणार


 


गुगल फोटो युजर्ससाठी मोठी बातमी : १५ जीबीपेक्षा अधिक स्टोरेज स्पेस हवी असल्यास पैसे मोजावे लागणार




फोनची मेमरी कमी असणाऱ्यांना आतापर्यंत फोनवरील फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोवर मोफत सेव्ह करता यायचे. मोबाईलमधील मेमरी वाचवण्यासाठी गुगल फोटोजचा वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मात्र आता आठ महिन्यानंतर म्हणजेच जून २०२१ नंतर असं करता येणार नाही. यासंदर्भात गुगलने आपल्या युझर्सला अधिकृत ईमेल केला आहे. जून २०२१ नंतर गुगलच्या फोटो अॅापमध्ये जास्तीत जास्त १५ जीबीपर्यंतची स्टोरेज मेमरी मोफत उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गुगल अकाऊंटसोबत १५ जीबी स्टोरेज मोफत दिला जाईल. मात्र त्यापुढे स्टोरेज हवी असल्याच गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या जीमेल आणि ड्राइव्हसाठी सशुल्क सेवा दिली जाते.




गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ हे जर २०२१ जून आधी सेव्ह केले असतील तर ते अनलिमीटेड स्टोरेजमध्ये ग्राह्य धरले जातील. मात्र त्यानंतर मर्यातील स्टोरेज युझर्सला दिली जाईल. म्हणजेच १ जून २०२१ नंतर गुगल युझर्सला केवळ १५ जीबीपर्यंतची फ्री स्पेस मिळणार असून त्यापेक्षा अधिक स्टोरेज स्पेस हवी असल्यास गुगलचे सबक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. सध्या गुगलने गुगल फोटोसाठी कोणतीही मर्यादा ठेवलेले नाही. त्यामुळे अगदी हाय रेझोल्युशन फोटोंपासून सर्व काही अगदी मोफत गुगल फोटोजवर सेव्ह करता येतात.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies