Type Here to Get Search Results !

म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे अतिकडक असे "उभ्या नवरात्राचे व्रत" सुरु



म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे अतिकडक असे "उभ्या नवरात्राचे व्रत" सुरु

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या, लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या संपूर्ण एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु असून दीवाळी पाडवा ते तुलसी विवाह या12 दिवसाच्या दरम्यान परंपारिक पद्धतीने व पूर्वापार चालत आलेले "उभ्या नवरात्रा" चे अतिशय कडक व्रत सध्या सिद्धनाथ मंदिरात सुरु झाले आहे.





म्हसवड येथील माणगंगेच्या तिरावर दहाव्या शतकातील अत्यंत प्राचिन असे हेमाडपंथी मंदीर उभे आहे. तेव्हापासून आज अखेर या मंदिरात परंपरागत चालत आलेल्या अनेक धार्मिक उपासना व अत्यंत कडक अशा व्रतांची अखंड आणि अव्याहत प्रथा अत्यंत मनोभावे सुरु असून "उभे नवरात्र" ही अतिशय कडक  आणि कठीण अशी उपासना आहे.





अनेक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अराध्य दैवत असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवी देवतांचा पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरेनुसार हळदी,विवाह आणि वरात या मंगल विवाहाच्या पायऱ्या आहेत. त्यानुसारच श्रींचा तब्बल एक महिना चालणारा विवाह सोहळा अनेक धार्मिक  कार्यक्रमांसह साजरा केला जातो. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याने शासन नियमांच्या अधीन राहूनच सर्व कार्यक्रम करावे लागणार आहेत.





या एक महिन्याच्या विवाहसोहळ्यातील सर्वात महत्वाचे व मुख्य असे हे 12 दिवस समजले जातात. कार्तिक शु.प्रतिपदा (दीपावली पाडवा) ते कार्तिक शु. प्रतिपदा (तुलसी विवाह) दरम्यान, दिवाळी पाडव्यादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies