भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणून माणगांव येथे नियुक्ती

भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणून माणगांव येथे नियुक्ती
 भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणून माणगांव येथे नियुक्ती

अलिबाग : सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटय़ाशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर जागतिक स्तरावर पिटी उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू आहेत. शेतमजूर कुटुंबातील या खेळाडूने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्‌स पर्सन ऑफ दी ईयर असे म्हटले होते.शासनाने त्यांना यापूर्वीच सेवेत घेतलं आहे .आंतराष्ट्रीय खेळाडू तहसिलदार म्हणून लाभल्याने माणगांवचे नाव उंचावले आहे. माणगावकरांकडून नवनियुक्त प्रभारी तहसिलदार यांचे अभिनंदन आणि स्वागत करण्यात येत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments