Type Here to Get Search Results !

आज पहिला दिवा वसुबारस : “ऋषी आणि कृषी’ या संस्कृतीचा मिलाप 


 


आज पहिला दिवा वसुबारस : “ऋषी आणि कृषी’ या संस्कृतीचा मिलाप 




सांगली  : भारतीय संस्कृतीतील प्रकाश, मांगल्य आणि उत्साहाचा सन असणाऱ्या दिवाळीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. गाय आणि वासराच्या पूजेचे महत्व असणारा वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांमधील पहिला दिवा. पूर्वी घरोघरी गाई होत्या. मात्र, सध्या शहरातील गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी गाय वासरांच्या पूजेचे आयोजन करण्यात येते. या दिवशी अनेक जण गायीच्या दुधापासून तयार केलेल्या पधर्थांचे सेवन करत नाहीत. तर सायंकाळी सवत्स गायींची पूजा केली जाते. यंदा गुरुवारी गोवत्स पूजनाने दीपावलीची सुरुवात होणार आहे. आपल्या देशातील ‘ऋषी आणि कृषी’ या संस्कृतीचा मिलाप असणाऱ्या वसुबारसेला गायीची सवंत्स पूजा करण्यात येते.




वसुबारस याचा अर्थ ‘वसू  म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. वर्षातील हा एक दिवस गाय आणि वासराच्या पूजेसाठी राखून ठेवला आहे. गुरुवारी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळात गाय आणि वासराचे पूजन करून, त्यांची प्रार्थना करावी. देवाला नैवेद्य आणि गोग्रास द्यावा. यासह गायीला गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करावा. 



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies