अर्नब गोस्वामींची सुटका :  सर्वोच्च न्यायालयाने केला गोस्वामी यांचा अंतरीम जामीन मंजूर

अर्नब गोस्वामींची सुटका :  सर्वोच्च न्यायालयाने केला गोस्वामी यांचा अंतरीम जामीन मंजूर


 


अर्नब गोस्वामींची सुटका : सर्वोच्च न्यायालयाने केला गोस्वामी यांचा अंतरीम जामीन मंजूरमुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. त्यावर गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. 
गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. यावरील सुनावणीवेळी खंडपीठाने अनेक प्रश्न उपस्थित केले. न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, मी त्यांचा चॅनेल पाहत नाही. त्या विचारसरणीशी तुम्ही सहमत नसाल. मात्र, घटनात्मक जबाबदारी असलेली न्यायालये जर हस्तक्षेप करणार नसतील तर आपण विनाशाच्या वाटेवर चाललो आहोत हे मान्य करावे लागेल. 
आम्ही उच्च न्यायालयाला आज संदेश देऊ इच्छितो की त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकारांचा वापर करावा. आपली लोकशाही ही जिवंत आहे. सरकारने अशा चॅनेलकडे दुर्लक्ष करायला हवे. अशा मुद्द्यावर निवडणूक लढली जात नाही. ते चॅनेलवर काय बोलतात याचा निवडणुकीत काही फरक पडतो असे तुम्हाला वाटते का, असेही खंडपीठाने सुनावले. 
अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments