खासगी बसचालकांना दिवाळीत मोठा दिलासा : पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी

खासगी बसचालकांना दिवाळीत मोठा दिलासा : पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी


 


खासगी बसचालकांना दिवाळीत मोठा दिलासा : पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी
मुंबई : कोरोना काळात बंद असलेल्या खासगी बसेसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याच्या परिवहन आयुक्तब कार्यालयाच्या प्रस्तावास अखेर राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे 50 टक्के क्षमतेने राज्यात प्रवासी वाहतूक करणार्यास खासगी बसचालकांना दिवाळीत मोठा दिलासा मिळाला आहे. 
सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या प्रवाशांना मात्र प्रवासास मनाई केली आहे. बस वाहतूकदारांना निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. दररोज बसच्या प्रत्येक फेरीनंतर त्याचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. प्रवाशांना मास्क सक्तीकचा असून बसचालकांनी प्रवाशांना मास्क पुरवण्यास सांगितले आहे. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवावा, जेवण किंवा अल्पोपहार आणि प्रसाधनगृहाजवळ बस थांबवताना प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments