पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील शहीद

पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील शहीदपाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील शहीद


कोल्हापूर :  पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा याठिकाणचे जवान संग्राम शिवाजी पाटील यांना पाकिस्ताने आज (२१ नोव्हें) केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले. 

निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. 

संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या मागे आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट असून आणखी किती सुपूत्र आपण गमावायचे? असा सवाल देखील करण्यात येवू लागले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments