आटपाडी शहरात आज पावसाच्या हलक्या सरी : शेतीसह आठवडी बाजारावर परिणाम

आटपाडी शहरात आज पावसाच्या हलक्या सरी : शेतीसह आठवडी बाजारावर परिणाम

 आटपाडी शहरात आज पावसाच्या हलक्या सरी : शेतीसह आठवडी बाजारावर परिणाम 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/धीरज प्रक्षाळे : आटपाडीमध्ये आज पहाटेपासूनच रिपरिप पावसाने हजेरी लावली असून सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीचे प्रमाण देखील हळूहळू वाढत आहे. अशातच भर म्हणून आज पावसाने देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहाटे सुरु झालेला पाऊस काही तासाच्या विश्रांती नंतर पुन्हा सुरु झाला. मात्र आज आठवडी बाजार असल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारासह भाजीपाल्याच्या बाजारावरही याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. आटपाडी शुक्र ओढ्यामध्ये पाणी असल्याने शेळ्या-मेंढ्यांचा भरणारा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये भरतो आहे. मात्र आजचा हा बाजार पावसामुळे कमी प्रमाणात भरला होता. पण पावसामुळे शेतकऱ्यांना निवारा म्हणून डाळिंब मार्केटचा आसरा घ्यावा लागला. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments