पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्राची यादी प्रसिध्द मतदारांनी मतदान केंद्राबाबत संपर्क साधून माहिती घ्यावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्राची यादी प्रसिध्द मतदारांनी मतदान केंद्राबाबत संपर्क साधून माहिती घ्यावी :  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी : निवडणूक निर्णय अधिकारी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी शिक्षक व पदवीधर मतदारांसाठी असणारी मतदान केंद्राची यादी अंतिम केलेली असून सदर मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सांगली जिल्ह्यामधील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसिल कार्यालय, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 

सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची खात्री करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1950 वर संपर्क साधून आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती घ्यावी. तसेच आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याची माहिती संबंधित तहसिल कार्यालयाकडे देखील उपलब्ध आहे. याबाबत संबंधित तहसिलदार कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post