आमदार पडळकरांनी "या" ठिकाणी केली वीज बिलाची होळी

आमदार पडळकरांनी "या" ठिकाणी केली वीज बिलाची होळीआमदार पडळकरांनी "या" ठिकाणी केली वीज बिलाची होळी 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : राज्यामध्ये कोरोना तसेच लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर वीज बिलाची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे खरसुंडी ता. आटपाडी येथील वीज वितरण केंद्रासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वीज बिलाची होळी करत आंदोलन केले. 
 

यावेळी  विलास काळेबाग, दिपक जाधव, मोहन शिंदे, कैलास शेंडगे, विलास जानकर, शहाजी भिसे, आनंदा चव्हाण, गणेश कटरे, तानाजी कटरे, अनिल मगदूम, रामचंद्र पवार, पप्पू कटरे, ऋषिकेश पुजारी, राहुल गुरव, धोंडीराम इंगवले आदी प्रमुख उपस्थित होते.


 


यावेळी “वीज बील माफ झालेच पाहिजे”, “महाविकासआघाडी सरकारची घोषणाचा भारी, हजारोची बिले घरोघरी”, “वाढीव बीज बील माफ झालेच पाहिजे” अशी घोषणाबाजी महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध करण्यात आली.

संकलन : धिरज प्रक्षाळे 
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments