"लाथो के भूत बातों से नही मानते" ; अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागले....

"लाथो के भूत बातों से नही मानते" ; अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागले...."लाथो के भूत बातों से नही मानते" ; अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागेल ....

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : कोरोना व लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत यासाठी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवार पर्यंत निर्णय न झाल्यास रस्तावरचा संघर्ष करावा लागले असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला आहे.


 


राज्यामध्ये कोरोना या महामारीने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनचा परिणाम म्हणजे अनेक नागरिकांना आपली नोकरी सोडून गावी जावून रहावे लागले. अनेक व्यवसाय बंद असल्याने छोटे-मोठे व्यवसायिक अडचणीत आले. तर सामान्य नागरिकांना आपल्या रोजच्या जीवनाची पर्वा निर्माण झाली होती.
त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील वीज बील भरणे अनेकांना शक्य झाले नाही. सृरुवातीला सरकारच्या वतीने उर्जामंत्री यांनी सवलतीची घोषणा करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. परंतु अचानक त्यांनी घुमजाव करून संपूर्ण वीज बील भरावे लागेल असे सांगत सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी शॉक दिल्याने राज ठाकरे यांची मनसे आक्रमक झाली.

मनसेच्या वतीने स्वत: राज ठाकरे यांनी राज्यपाल यांना भेटून वीज बिलाच्या प्रश्नाबाबत सर्वसामान्यांना दिलासा देण्याची त्यांनी मागणी केली होती. तसेच वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण "लाथो के भूत बातों से नही मानते" असे ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाना साधला आहे.  


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments